Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मातीमधे रुजवा मला Gazalkar Divakar Joshi

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷मातीमधे रुजवा मला🌷


वाहतो आहे सरळ अडवा मला 

कोरड्या मातीमधे जिरवा मला


बंद दाराआडचा कंदील मी

मारुनी फुंकर कुणी विझवा मला


तो स्वतः उतरेल शंभर पायऱ्या 

फक्त एकच पायरी चढवा मला


जन्मलो घेऊन जो लवचिकपणा 

त्याच साच्याने पुन्हा घडवा मला


रोज कुठवर मी सरळ चालायचे

एकदा देऊन जा चकवा मला


शक्य झाले तर पुन्हा उगवेन मी 

शेवटी मातीमधे रुजवा मला


ही स्थिती नाही समाधीसारखी 

गाढ निद्रेतुन कुणी उठवा मला


दिवाकर जोशी


 गझलकार दिवाकरजी जोशी यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments