● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷काळीज सुधरण्याजोगे नाही🌷
नविन काही बघण्याजोगे नाही
नविन काही करण्याजोगे नाही
हसून करुया हलके या दुःखाला
दुःख आपले रडण्याजोगे नाही
तुझे व्हायचे होते झालो होतो
तुला यातले कळण्याजोगे नाही
घरात इतक्या आठवणींच्या चिंध्या
घर सुद्धा आवरण्याजोगे नाही
काय करू मी असल्या परिस्थितीचे
जगणेही परवडण्याजोगे नाही
कुठून आलो कुठे निघालो आहे
यावर काही म्हणण्याजोगे नाही
बरे व्हायचे..पुन्हा खायची माती
हे काळीज सुधरण्याजोगे नाही
तुषार दादासाहेब शिंदे
गझलकार तुषारजी शिंदे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments