● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷वांझ ठरते शेवटी गर्भार चर्चा 🌷
संसदेचे कान करते ठार चर्चा;
वांझ ठरते शेवटी गर्भार चर्चा!
एक साधी नोकरी नाही मिळाली;
शिक्षणाला झोंबली बेकार चर्चा.
जीव गेला घेत फाशी जो अभागी
त्या चितेला लावते अंगार चर्चा.
द्यावया पैसे बिलाचे तोंड लपवी;
रंगलेली तोवरी दिलदार चर्चा.
ऐनवेळी बोलणी करते तहाची;
पाहिली ना एवढी लाचार चर्चा!
होत नाही फायदा चर्चेतुनी कां?
ह्याच मुद्यावर म्हणे होणार चर्चा!
श्रीकृष्ण राऊत
गझलकार श्रीकृष्ण राऊत सर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments