Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

कसे तुझ्या मनातले Kase Tujhya Manatale

 

Gazalkara Yashashri Rahalkar
Gazalkara Yashashri Rahalkar

कसे तुझ्या मनातले 

न शोधता दिसायचे , कसे तुझ्या मनातले 

न सांगता कळायचे, कसे तुझ्या मनातले


विसावते न वाट ही , न मान्य थांबणे हिला

शहर तिथे वसायचे, कसे तुझ्या मनातले 


तुझे फितूर भाग्य जर, अखेर गाठते तुला

हवे तसे घडायचे, कसे तुझ्या मनातले


मदांध श्वापदे दडून कोपऱ्यात बैसली

ससे धवल जपायचे , कसे तुझ्या मनातले


तुझ्या मनातली जखम , उकल हळूच एकदा

व्रणांस मी पुसायचे , कसे तुझ्या मनातले


जगायचे हिशोब ना , तिच्यासवे जुळायचे

गणित व्यस्त व्हायचे, कसे तुझ्या मनातले


पहाट नीट राखते व्यथेस कोरडे अता

दवात मग भिजायचे ,कसे तुझ्या मनातले


यशश्री_रहाळकर 

Post a Comment

0 Comments