Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पक्षी Gazalkara Nisha Chausalkar

Gazalkara Nisha Chausalkar
 Gazalkara Nisha Chausalkar

 पक्षी

काडी काडी साठी काही थकून गेले पक्षी

पंखांना बळ मिळता काही उडून गेले पक्षी


झाल्यावरती वादळ मोठे  सपाट झाली झाडे 

पुन्हा नव्याने उचलत काड्या रमून गेले पक्षी


डबक्यामधल्या पाण्यामध्ये कुणी सोडल्या होड्या

नाव पाहुनी आठवणींचे हसून गेले पक्षी


इमारतींच्या जंगलामधे  गायब झाली झाडे

शोधत जागा  घरट्यासाठी निघून गेले पक्षी


वावर सारे उदास पडले, सुकून गेली रोपे

टिपण्यासाठी शोधत  दाणा   झुरून गेले पक्षी


देह लटकता फांदीवरचा दिसला त्यांना आधी

चोचीमधली फळे टाकुनी पळून गेले पक्षी


कैदेमध्ये दाणा पाणी सारे काही होते

आकाशाच्या विरहामध्ये मरून गेले पक्षी


सौ. निशा चौसाळकर 

अंबाजोगाई

Post a Comment

0 Comments