Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

चुकून सुटला Gazalkar Suresh Tayade

 

Gazalkar Suresh Tayade
Gazalkar Suresh Tayade 

चुकून सुटला 


चुकून सुटला .. तोच हातचा धरणे बाकी आहे

हिशोब आयुष्याचा चुकता करणे बाकी आहे


आजपर्यंत चुकते झाले व्याजच भरणे केवळ

अजून मुद्दल आयुष्याची भरणे बाकी आहे


आजवर फक्त राखत आलो मर्जी ह्याची त्याची

माझ्यासाठी म्हणून माझे सरणे बाकी आहे


स्वभावातला अती गोडवा घातक ठरला त्याचा

ओरबाडले सगळ्यांनी बस मरणे बाकी आहे


जरी टाकले भुतकाळाला मी अडगळीत माझ्या

आठवांतून तरी तुझ्या सावरणे बाकी आहे 


सुरेश तायडे,मलकापूर

Post a Comment

0 Comments