Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आयुष्या-Gazalkar Mukundrao Jadhav



Gazalkar Mukund Jadhav
Gazalkar Mukundrao Jadhav 

आयुष्या


मानले कुटुंबाला नित्य व्यास आयुष्या
लावली नजर कोणी बघ सुखास आयुष्या

हक्क राज्यघटनेचा, नित्य जाणला आहे
कोंडला तरी माझा आज श्वास आयुष्या

जीवनात दु:खे तू दावलीस जेव्हाही
शिष्य मी तुझा बनलो फार खास आयुष्या

काल भास्करालाही घातली गवसणी मी
सांजवेळ येता मी, का उदास आयुष्या

माळताच गजरा ती हासली अशी खुदकन 
रूप पाहुनी झालो मी खलास आयुष्या

-ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव
   जळगाव 


Post a Comment

0 Comments