Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पाहिजे कोणीतरी Gazalkara Dr Snehal Kulkarni

 • गझल प्रभात •    (भाग १ )

पाहिजे कोणीतरी gazalkara Dr Snehal Kulkarni
 Gazalkara Dr Snehal Kulkarni


🌹पाहिजे कोणीतरी 🌹


वाट माझी जाणणारा पाहिजे कोणीतरी

सांडले तर वेचणारा पाहिजे कोणीतरी


रोज मी उजळेन वाती रात्रभर त्याच्यापुढे

चांदण्या नाकारणारा पाहिजे कोणीतरी 


नेहमी सजवेन माझे रूप बिजलीसारखे

श्वास रोखुन पाहणारा पाहिजे कोणीतरी


मी मिठी मारेन त्याला.. तो खुनी असला तरी

शस्त्र खाली ठेवणारा पाहिजे कोणीतरी


दानशुर कर्णाप्रमाणे व्हायचे आहे तुला 

कर्णकुंडल मागणारा पाहिजे कोणीतरी


पारखी होईन त्याला जर पळत सुटले पुढे

हद्द माझी सांगणारा पाहिजे कोणीतरी


तो जिथे नेईल तेथे एकटी जाईनही

पण 'दिशा'.. धुंडाळणारा पाहिजे कोणीतरी


.. दिशा

(डॉ. स्नेहल कुलकर्णी )

गारगोटी जि. कोल्हापूर

मो. 9922599117


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक

भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments