Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

शाई तुझ्या पत्रातली Gazalkar Nilesh Kawade

Gazalkar Nilesh Kawade
Gazalkar Nilesh Kawade


शाई तुझ्या पत्रातली

कुठे केवळ स्मृतींना पालवी फुटली...
मनाच्या आरश्याची काचही फुटली...

सजा मिळणार म्हाताऱ्यास महिनाभर
चुकीने औषधीची बाटली फुटली...

पुन्हा झेपावला ना दाब तृष्णेचा
पुन्हा वस्तीतली जलवाहिनी फुटली...

जरा नजरानजर अन् लागला 'चटका'
तिच्या हातातली मग कपबशी फुटली...

असा काही पदांचा थाट आताशा
नवी शिंगे जशी डोक्यावरी फुटली...

अचानक रंग संसारातला उडला 
जशी दारात मदिरेची शिशी फुटली...

निशाणी लोकशाहीची अशी दिसली
मते यंदा अमुक जातीतली फुटली...

पुन्हा केवळ तिचे पाणावले डोळे
पुन्हा प्रणयात केवळ बांगडी फुटली...

लढाई जिंकलो असतोच पण हरलो
जवळची ऐनवेळी मंडळी फुटली...

घरी जर सर्व काही चांगले आहे
कशी शाई तुझ्या पत्रातली फुटली...

...... निलेश कवडे,अकोला


 

Post a Comment

0 Comments