Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आयुष्याचे मोल Gazalkara Sharayu Shaha

आयुष्याचे मोल Gazalkara Sharayu Shaha
Gazalkara Sharayu Shaha


आयुष्याचे मोल

आयुष्याचे मोल अताशा प्रेशस बनते आहे
म्हणून सुंदर जगण्यावरती फोकस करते आहे

सर्व विरोधक एक जाहले हल्ला करण्यासाठी 
विरोधकांना ना जुमानता श्रेयस घडते आहे

बलवत्तर जर नशीब अपुले, कोठेही ते फुलते
वाळवंटामधे असूनही, कॅक्टस जगते आहे

परिस्थिती शिकवते घडवते, ती उपकारक असते
सरळपणाचे साधे जीवन फेमस ठरते आहे

जगण्याची शाश्वती ना जरी, हरायचे पण नाही
भाग्याने जो दिवस मिळे तो, बोनस म्हणते आहे

डॉ.शरयू शहा,मुंबई.


 

Post a Comment

0 Comments