![]() |
Gazalkar Sanjay Tidake |
इतिहास जरा वाचू
बरेच आले आणिक गेले इथे आमच्या आधी
इतिहास जरा वाचू त्यांचा पुढे जायच्या आधी
लागणार ना तुझा रावणा निभाव आता येथे
रूप पाहते निरखून सिता दान द्यायच्या आधी
देता येतो आकार म्हणे लोखंडाला सुद्धा
नकोस घालू घाव म्हणाला ताव यायच्या आधी
उरली नाही भिती कोणती मरावयाची आता
मी देहाचे चंदन केले मुक्त व्हायच्या आधी
सोपे नसते कधी कुणाला दान मागणे इतके
खुली करावी मूठ लागते दान घ्यायच्या आधी
संजय तिडके,लातूर
0 Comments