Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आईसंगे मूर्त लाभले नाते Gazalkar Abhijit Kale

• गझल प्रभात • (भाग १४ )

आईसंगे मूर्त लाभले नाते
Gazalkar Abhijit Kale


🌹आईसंगे मूर्त लाभले नाते🌹


कसे भेटलो कुठे भेटलो कशास जुळले नाते?

ह्या प्रश्नांचे आहे उत्तर हेच आपले नाते


बोलत होतो, 'जगात कोणी कोणाचाही नाही'

बोलच ठरले केवळ जेव्हा दृढ जाहले नाते.


नाळ तोडली गेली तेव्हा ताटातुट की झाली

त्याच क्षणी पण आईसंगे मूर्त लाभले नाते


नात्याधले बंध जपाया तडजोडीचा रस्ता

चुकला रस्ता जर कोणी तर समजा तुटले नाते


नाव दिल्याने नात्यांना का ओळख त्यांना मिळते?

नावच नसता दुनिया म्हणते असले कसले नाते?


ओढ असावी कोण अनामिक?.. काय आत कळवळले

फोन लागला नाही म्हणुनी जर गहिवरले नाते


ह्या हृदयाच्या त्या हृदयाला जश्या भावना कळल्या

शब्दांवाचुन मनामनाचे 'मन' अवतरले नाते


अभिजीत काळे

मो. 9850690597


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments