• गझल प्रभात • (भाग १३ )
![]() |
Gazalkara Nilofer Faniband |
🌹 शहर उद्ध्वस्त झाल्यावर भेटायचे नसते 🌹
जिथे किंमत तुझी कळते, तिथे टाळायचे नसते
जखम होतेय सन्मानास तर थांबायचे नसते
बरसतो वाटते तेंव्हा..कसा पाऊस अवकाळी
अशा पण पावसामध्ये कधी बहरायचे नसते
नका येऊ कुणीही त्या जुन्या शहरात शोधाया
शहर उद्ध्वस्त झाल्यावर कधी भेटायचे नसते
जिथे असतात दोघेही मनाच्या दोन ध्रुवांवर
तिथे कुठलेच रेखावृत्त मग शोधायचे नसते
मनाच्या वावरामध्ये व्यथा पेरून दुसर्याच्या
'फुलू दे बाग माझी' दान हे मागायचे नसते
निलोफर फणीबंद-शेख
अक्कलकोट, सोलापूर
मो. 9763343462
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments