• गझल प्रभात • (भाग १५ )
Gazalkar Chandrakant Kadam
🌹जिंदगी ...साधीसोपीही नसते🌹
माझ्यात जिव्हाळा सोडुन बाकी काहीही नसते
हृदयात तुझ्या असते जे...माझ्या गावीही नसते
लिहितो कोणासाठी मी ठाऊक मलाही नाही?
लिहिलेले सारे केवळ माझ्यासाठीही नसते
ताईत बनवते केंव्हा खाईत लोटुनी देते
जिंदगी वाटते तितकी साधीसोपीही नसते
निर्भीड कधी कोणाला विक्षिप्त वाटतो कारण
वागणे बोलणे माझे माझ्या हातीही नसते
दारात कुणाच्या कायम लक्ष्मी पाणी भरते तर
ताटात कुणाच्या साधी भाकरभाजीही नसते
सुख समृद्धी असताना जमतात शेकडोजण पण
दुःखात एकटे आपण...सोबत कोणीही नसते
जेवढी अराजकता या देशात माजली आहे
तेवढी भयानक कुठली आणीबाणीही नसते
एकेक हट्ट बहिणीचा थाटात पुरवतो कोणी
बहिणीसाठी कोणाच्या साडीचोळीही नसते
मस्तवाल सत्तांधांना दाखवून देते जागा
जेवढी वाटते जनता तितकी साधीही नसते
चंद्रकांत कदम (सन्मित्र)
नांदेड
मो. 9921788961
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments