• गझल प्रभात • (भाग १९ )
![]() |
Gazalkar Aijaj Shaikh |
🌹तुमच्यात बुद्ध ठेवा पिंपळ बघायला 🌹
टिकली बघायला ना काजळ बघायला
आलो तुझ्या मनाचा मी तळ बघायला
डबक्यामधे नदीची तळमळ बघायला
आलेत सर्व वारे हे स्थळ बघायला
माणूस वाचणेही आहे खरी कला
डोळे कुठे मिळाले केवळ बघायला
तुळशी घरातली ती लक्ष्मी घरातली
जाऊ नका मुलीचा मंगळ बघायला
आधी वसंत आला पानाफुलासकट
तेव्हा कुठे मिळाले हे फळ बघायला
आधी ख-यास खोटे करण्यास सांगुनी
येतात मग मनाचा गोंधळ बघायला
मरताक्षणीच माझे दानात द्या नयन
अंधारल्या जिवाला द्या बळ....बघायला
ज्यांनी मला न केले आयुष्यभर जवळ
येतील प्रेत माझे केवळ बघायला
मार्गात ठिकठिकाणी दिसणार बाभळी
तुमच्यात बुद्ध ठेवा पिंपळ बघायला
एजाज़ शेख
अकोला
मो. 9665203106
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments