• गझल प्रभात • (भाग १८ )
![]() |
Gazalkar Tushar Shinde |
🌹ओव्यांमागे जाते गेले🌹
ओलावे भिंतींचे गेले
आज्जी गेली सगळे गेले
मागे उरल्या चांदणगोष्टी
चाक पुढे काळाचे गेले
थरथरणार्या हातांसोबत
लोट हजार उबींचे गेले
आयुष्याचा सूर हरवला
आनंदाचे गाणे गेले
ज्याने हे घर सुदृढ होते
ते गुणकारी बटवे गेले
कोण दृष्ट काढेल आपली
हात कुठे मायेचे गेले
जात्यांवरच्या ओव्या गेल्या
ओव्यांमागे जाते गेले
तुषार दादासाहेब शिंदे
फलटण जि. सातारा
मो. 9890514716
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments