• गझल प्रभात • (भाग २० )
![]() |
Gazalkar Dinesh Bhosale |
🌹 पळवुन नेले लढणाऱ्याचे पाणी🌹
पळणाऱ्याला दिसले नाही रडणाऱ्याचे पाणी
रडणाऱ्याला कळून चुकले पळणाऱ्याचे पाणी
चार शितांवर जगता येते असे म्हणाली समिती
समितीला त्या कधी न कळले कसणाऱ्याचे पाणी
बाष्प साठवुन पाउस पाडू एसीमधले वदले
भिंतीआडुन कुणास दिसले जळणाऱ्याचे पाणी!
नम्र फुलाला डसून जाते ताठरतेची नांगी
त्या नांगीला कधी न दिसले फुलणाऱ्याचे पाणी
बंड छेडण्यासाठी ज्याला दिली सुपारी त्यांनी
त्या वाऱ्याने पळवुन नेले लढणाऱ्याचे पाणी
दिनेश भोसले
त्रिवेणीनगर, तळवडे
मो. ९८८१६२५७४५
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments