• गझल प्रभात • (भाग १६ )
![]() |
Gazalkara jyotsna Chandgude |
🌹काव्य माझे कूळ आहे🌹
लेखणीचा वंश माझा मूळ आहे
मी कवी अन् काव्य माझे कूळ आहे
का अशी भांबावते मी संकटांनी
संयमी जर रास माझी तूळ आहे
का अचानक प्रेम केले झोकले मी
छंद वेडी घेतलेले खूळ आहे
मोह झाला एक क्षणभर द्रौपदीला
साक्ष देणारी कथा जांभूळ आहे
तान्हुल्याला ठेवताना दूर देशी
जन्मदा झाली किती व्याकूळ आहे
मुखवटा मी चढवला अन् वाटले की
आरशावर साचलेली धूळ आहे
चूक होते होत नाही पाप कारण
मीच माझा बांधलेला सूळ आहे
ज्योत्स्ना चांदगुडे
मो. 7385406673
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments