• गझल प्रभात • (भाग २१ )
![]() |
Gazalkara Priya Kaulwar |
🌹पायऱ्या विकारी गेला चढून आहे🌹
ते रूप सावळेसे दिसते म्हणून आहे
बहुतेक सावलीच्या प्रेमात ऊन आहे
धावू नको कधी तू रेषेत कल्पनेच्या
प्रत्येक अंश जातो माझ्यामधून आहे
वळणावरी तुझ्या मी अजुनी उभीच आहे
धरशील हात माझा हे ही कळून आहे
सुर्या तुझ्यामुळे हे आकाश उजळले पण
अंधार का धरेच्या उदरी भरून आहे
चित्तास रोज खाती चिंता किती उद्याच्या
माणूस काळजीने खचतो अजून आहे
पाऊस मी फुलांचा झेलून रोज घेते
उद्यान या मनाचे माझ्या भिजून आहे
पुरता प्रकाश माझ्या घरट्यात येत नव्हता
पण डाव हा जगाचा मी ओळखून आहे
तू गाठणार कैसे ते टोक शांततेचे
जर पायऱ्या विकारी गेला चढून आहे
प्रिया कौलवार
मो. 70209 39617
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments