• गझल प्रभात • (भाग १७ )
![]() |
Gazalkar Divakar Joshi |
🌹सोडले नाही तरी मी तत्व माझे🌹
काढले खरडून त्यांनी सत्व माझे
सोडले नाही तरी मी तत्व माझे
नांदती देहात माझ्या राम रावण
कोणते समजू खरे पुरुषत्व माझे
मारतो फाट्यावरी जेंव्हा जगाला
आडवे येते मला संतत्व माझे
तू नको सांगू वसंताची कहाणी
मी अता स्वीकारले वंध्यत्व माझे
फक्त नावाचाच नाही मी दिवाकर
या बघा केंव्हातरी दिव्यत्व माझे
दिवाकर जोशी
परळी
मो. 8668453390
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments