• गझल प्रभात • (भाग ९ )
Gazalkar Maroti Arewar |
फुलाप्रमाणे दरवळता येते
आयुष्याला सुरेख सुंदर करता येते
फुलाप्रमाणे चहूकडे दरवळता येते
हातामध्ये कोणाच्याही मृत्यू नसतो
जोवर जगतो मनाप्रमाणे जगता येते
लाचारीने कशास आता जगावयाचे
हक्कासाठी प्राणपणाने लढता येते
सोडत जावे कशास सारे नशिबावरती
पडता उठता संघर्षाने घडता येते
नको प्रतीक्षा उजेड कोणी द्यावा याची
दिव्यासारखे ठामपणाने जळता येते
मारोती आरेवार
गडचिरोली
मो. 9403239435
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments