• गझल प्रभात • (भाग १० )
![]() |
Gazalkara Asavari Jadhav |
🌹दयाधर्म शिकवला फुलांनी 🌹
चिरडले तरीही दिला गंध त्यांनी
दयाधर्म सुंदर शिकवला फुलांनी
व्यथा ऐकणारा कुणी आज नाही
उगा मांडलेला पसारा व्यथांनी
सुखावून गेला बळी आज कारण
दिलासा जरासा दिलेला ढगांनी
जरा वाद होता.. घराचे विभाजन
गळा घोटलेला सुखाचा मुलांनी
जरी दूर आपण....मला खंत नाही
दिली साथ कायम तुझ्या आठवांनी
सौ. आसावरी जाधव
विरार
मो. 74993 70593
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments