Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

थकलो मुळीच नाही Gazalkar Nitin Gadve

• आजची गझल • (भाग १२ )

थकलो मुळीच नाही
Gazalkar Nitin Gadve 


🌹थकलो मुळीच नाही 🌹


मृत्यो! तुझ्या भयाने,लपलो मुळीच नाही

मी थांबलो जरासा, थकलो मुळीच नाही


करतो नशा व्यथांची, सांभाळुनी स्वतःला

नजरेमधून माझ्या, पडलो मुळीच नाही


नश्वर अशा जगाच्या, मोहात आज जो तो

मीही अशातुनी मग, सुटलो मुळीच नाही


प्रत्येक माणसाच्या, हातून चूक होते 

माझ्याकडून झाली, चुकलो मुळीच नाही


वाईट यामधे मी, वाटून काय घेऊ?

वाचूनही तुला मी... कळलो मुळीच नाही


नितीन गडवे

नाशिक

मो. 9921282210


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक

भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments