• गझल प्रभात • (भाग ११ )
Gazalkar Shantaram Hivrale
🌹कळले आता 🌹
खरेपणाची दुनिया नसते कळले आता
स्वार्थापायी नाते तुटते कळले आता
ऋतू इथे का रंग बदलती माहित नव्हते?
वृक्षतोड ही सतत चालते कळले आता
तुझे वागणे तुझे बोलणे रुचले नाही
संस्काराविण जगणे अडते कळले आता
कधी तरी तू मनात माझ्या अजून येते
निरवतेत ही वादळ उठते कळले आता
इथे कसा बाजार मांडला कळ्याफुलांचा
श्वास कळ्यांचे कोण रोखते कळले आता
तू गेल्यावर कळली मित्रा तुझी योग्यता
मित्राचे मन निर्मळ असते कळले आता
किती भरोसा ठेवावा बघ समजत नाही
गोड बोलणे गळा कापते कळले आता
शांताराम हिवराळे
पिंपरी,पुणे
मो. 9922937339
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments