• गझल प्रभात • (भाग ५ )
![]() |
Gazalkara Shakuntala Chavan |
🌹तुझ्या आठवांनी मला ग्रासलेले🌹
मनी वेदनांचे तळे साठलेले
तुझ्या आठवांनी मला ग्रासलेले
जगा काय सांगू मनातील माझे,
तुझे भाववेडे किती दाटलेले
हवेसे घडेना नकोसे रुजेना
सवालात सारे किती थांबलेले
अचानक सखीची जशी भेट झाली
तिचे भाव ओले तसे जाणलेले
दिसे माणसेही सुखी फार येथे
कुणी त्रासलेले कुणी फाटलेले
प्राचार्या डॉ. शकुंतला चव्हाण
जळगाव
मो. 9975648602
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी, मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments