• गझल प्रभात • (भाग ७ )
![]() |
Gazalkara Archana Murugkar |
🌹युद्धात काय आहे 🌹
माणूस एक हा जर वादात काय आहे
विध्वंस सोडला तर युद्धात काय आहे
साधाच मोगरा पण गंधात सत्व सारे
विश्वास संपला तर दोघात काय आहे
ज्ञाना तुक्यास पावत धावून येत गेला
पाषाण मानले तर देवात काय आहे
सोबत असो नसो पण झुरते सख्या करीता
त्यागास सोडले तर प्रेमात काय आहे
गावी नसेल ती जर रमण्यात राम नाही
पाणी नसेल त्या पण गावात काय आहे
अर्चना मुरूगकर
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 9762863231
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments