• गझल प्रभात • (भाग ६ )
![]() |
Gazalkara Yogita Kale |
🌹 वादळ 🌹
बांधून ठेवले मी पदरात वादळाला
येऊ दिलेच नाही घरट्यात वादळाला
विश्वास ठेवल्यावर थोडा परस्परांवर
मिळणार वाव नाही नात्यात वादळाला
संशय नको जराही माझ्या तुझ्यात आता
ठेचून नित्य काढू प्रेमात वादळाला
बळ लाभते जिवाला एकत्र राहिल्यावर
देऊच मात आपण दुःखात वादळाला
जोखड परंपरांचे उलथून टाकले मी
कोंडून ठेवले ना हृदयात वादळाला
सौ. योगिता अभिजित काळे
उपळावी ता. तासगाव जि. सांगली
मो. 9860974547
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments