Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

एक जखम भळभळते आहे Gazalkar Manoj Varade

 • गझल प्रभात • (भाग ४९ )

एक जखम भळभळते आहे
Gazalkar Manoj Varade

🌹एक जखम भळभळते आहे🌹


आगमनाने वरुणाच्या दरवळते आहे

गात्रांमधुनी भूमाता हिरवळते आहे


प्रेम समजली ज्याला होता जिहाद जहरी

सापळ्यातली लेक कशी तळमळते आहे


स्वाभिमान सोडला जरी मी सत्तेसाठी

मंत्रीपद तरी माझे डळमळते आहे


शेत डवरले डोलत होती कणसे भारी

कुठे कळेना एक कीड वळवळते आहे


आले चढवून खास मुखवटा आनंदाचा

प्रत्येकाची एक जखम भळभळते आहे


मनोज सूर्यकांत वराडे

मुंबई 


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments