• गझल प्रभात • (भाग ५०)
![]() |
Gazalkar B H Magdum |
🌹जीवनाची बासरी🌹 |
भेट प्रेमाची गुलाबी लाजरी मी
बघ तुझ्या प्रेमात वेडी बावरी मी
भेट होता ह्रदय माझे फुलत गेले
काळजासह छान गाली हासरी मी
जीवनांची प्रीत माझी ती निराळी
पाहुनी घे आज देते खातरी मी
चंद्र ता-या सांरखे शृंगार माझे
चांद राती शोभणारी साजरी मी
बघ बियाणे पेरल्यांने पीक डोले
त्या शिवारी डोलणारी काकरी मी
पोसते घर भाबडे मन नार भारी
राबणाऱ्या त्या भुकेला भाकरी मी
गोड खाऊ गोड गाऊ वैभवाशी
गोड गाते जीवनांची बासरी मी
बा. ह. मगदूम
(मध्य रेल्वे पुणे, कार्यरत)
मो. ९८२२५१८०९९
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments