देवनागरी लिपीतली मराठी गजल मराठीच असावी!
![]() |
सदानंद डबीर |
1.मराठीने, दोन दोन ओळींची शेराची रचना,स्वरसाम्यता (काफिया). असल्यास,समान अक्षरांचे यमक(रदीफ)....हा आकृतीबंध व त्यातून निर्माण होणारी जबरदस्त कविता म्हणजेच शेरीयत व गजलियत
इतकेच घ्यावे.एका गुरुचे दोन लघु किंवा दोन लघुंचा एक गुरु हे घ्यावेत.
2.माधव जूलियनांनी वृत्त आणली आहेतच.ती आपण घेतली आहेतच.शिवाय मात्रिक छंद हे आपले बलस्थान आहेच.
बाकी गजलचे सगळे यम नियम,जे मुख्यतः लिपीतील फरकाने व अरबी/फारसी छंदशास्त्राच्या अनुषंगाने येतात,ते मराठीने का घ्यावे?
3. देवनागरी लिपीत लिहिलेली मराठी भाषा ही उच्चार व छंदवृत्ताच्या दृष्टीने सर्वाधिक निर्दोष भाषा आहे.इतर अनेक भाषा उर्दू, इंग्रजीसह अनेक भाषात स्पेलिंग प्रमाणेच उच्चार असेल ह्याची खात्री नसते.सायकाॅलजीत P का? Put चा उच्चार *पुट* मग but चा उच्चार *बट* का?
उर्दूतही तुम्हाला शब्द माहिती नसेल तर चुकीचा उच्चार होऊ शकतो.लफ्ज का गिरना वगैरे आहेच.जो,वो,है,मै ही लिहिताना गुरू अक्षरे लिहायची व उच्चार लघु करायचा! असली फसवणूक देवनागरी मराठीत अशक्य आहे. दीर्घ लिहिले आहे तर दोन मात्राच होणार.
अगदी मराठी भाषा नव्याने शिकणारा असला तरी चूक होणार नाही.
4.तर, प्रारंभी नमूद केलेल्या गोष्टी
वगळता,गजलचे अन्य यम नियम,मराठी भाषेने आपला स्वभाव व मुख्य म्हणजे देवनागरी लिपी ह्याला अनुरूप बनवावे.मराठी गजल निश्चितच प्रगल्भ होईल.अमृताते पैजा जिंकणा-या मराठीला ते अशक्य नाही.
5.आपल्याला लाभलेल्या सर्वाधिक निर्दोष अशा देवनागरी लिपीच्या वारशाची आपल्यालाच चाड नाही.अभिमान नाही. गजलच्या एवढ्या तेवढ्या
बाबीसाठी आपण उर्दूच्या दारात कटोरा घेऊन उभे राहणार आहोत का?
*गजल तंत्राच्या दहशती विरोधात आता एल्गार पुकारण्याची वेळ आली आहे.*
सदानंद डबीर. ७ऑक्टोबर २०२३.
. ●○●○●
0 Comments