Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

लघुअक्षरी शब्द व गजलवृत्ते:एक अराजक

लघुअक्षरी शब्द व गजलवृत्ते:एक अराजक

                                       
लघुअक्षरी शब्द व गजलवृत्ते:एक अराजक
सदानंद डबीर 

1.आपल्या अक्षरगण वृत्तांमध्ये,एका गुरु अक्षरा ऐवजी दोन लघु अक्षरे घेताच येत नाहीत.
कारण,तीन अक्षरांचा गण बदलतो व पर्यायाने वृत्त बदलते,अथवा वृत्तदोष होतो.

 2. मात्रिकछंदामध्ये,गणमात्रिकसंख्येने,ठरतात, तिथे लगक्रम बघितलाच जात नाही.

त्यामुळे एका गुरु ऐवजी दोन लघु वापरा की न वापरा,काही फरक पडत नाही.समजा 8-8-8-6
असा तीस मात्रांचा छंद आहे.तर शक्यतो यति सांभाळून 8 मात्रांध्ये,तुम्ही कुठलाही लगक्रम घ्यायला मुक्त असता.

3. एका गुरु ऐवजी दोन लघु किंवा vicea versaचा प्रश्न फक्त गजल वृत्तांमधेच निर्माण होतो.
त्यासाठीचे कुठलेही ऑथेंटिक नियम मला मराठीत वा उर्दूत दोन्हीतही आढळले नाहीत.काही स्वयंघोषीत गुरू किंवा गजल कार्यशाळेतल्या शिक्षकांनी काही नियम सांगितले
असण्याची शक्यता आहे. पण ते प्रमाण मानता येत नाहीत. कारण, "स्वरसाम्यता असलेले कवाफिये वापरतानाही शक्यतो त्याआधीच्या अक्षरात अलामत सांभाळावी".असे 
दिव्यज्ञान देणारे गजलगुरू आहेत. 

4.सरळ,विरळ,गजल,कमल,शरद,सवय,चलन
असे असंख्य शब्द आहेत.जे _लगा_ घ्यायचे की
_गाल_ ह्यावर मतभेद आहेत.
एक अराजक सदृश्य परिस्थिती आहे.
माझ्याकडून इस्लाह करवून घेणारा एक नवोदित गजलकार,अतिशय नम्रपणे मला म्हणाला,
"सर, गजल हा शब्द तुम्ही गाल (गज,ल) असा वापरलाय तो चुकलाय. तो *लगा* (ग,जल) असा आहे.तुमचं वृत्त चुकलंय का?"

5. सरळ हा शब्द _स, रळ_ असाही नाही किंवा _सर,ळ_ असाही नाही. तो _सरळ_
असा सलग उच्चारच अपेक्षित आहे.तीच गोष्ट इतर तीन लघुअक्षरे असलेल्या शब्दांची आहे.

6.मग अशा शब्दांची व्यवस्था कशी लावायची?
गाल, घ्यायचे की लगा?
माझ्या मते,ते शब्द ललल ह्याच वजनात राहतात. _गाल_ ही नाही की _लगा_ ही नाही.

7.मग वृत्ताचं काय? वृत्त कसं सांभाळायचं?
मी डाॅ.राम पंडितांशी चर्चा केली.त्यांच्या मते,  
     "तेवढी ओळ मात्रिक छंदात समजायची.व एकूण मात्रा सारख्याच असल्याने वजन सांभाळले आहे,असे मानायचे"
"गजल" शब्द म्हणजे, लगा की गाल....हा वाद निरर्थक आहे. असेही ते म्हणाले. 
         . सदानंद डबीर.

Post a Comment

0 Comments