• गझल प्रभात • (भाग २८ )
![]() |
Gazalkar Dilip Patil |
🌹रितीच अमुची झोळी आहे🌹
जनता वेडी अंध भाबडी भोळी आहे
त्यावर शासन खुशाल भाजत पोळी आहे
श्रीमंतांच्या हुंकाराला किंमत येथे
हवेत विरते दुबळ्यांची आरोळी आहे
कुठे सुरक्षित अजून अमुच्या भगिनी येथे
कुणी फाडतो साडी कोणी चोळी आहे
राजकारणी, संधीसाधू बगळे भवती
जनसत्तेची तडफडते मासोळी आहे
न्याय हक्क तर मिळणे झाले दुर्मिळ आता
पाय उचलता निर्दय बंदुक गोळी आहे
या देशाचा विकास झाला जरी मानले
अजून का मग रितीच अमुची झोळी आहे?
रोज नवनव्या क्लृप्त्यांनी नागवले जाते
सत्तेमध्ये चोर लुटारू टोळी आहे
दिलीप सीताराम पाटील
राजूरा
मो. 8390893961
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments