Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

लपवून आसवांना थोडे हसेन म्हणतो Gazalkar Ajay Deshpande

 • गझल प्रभात • (भाग २७ )

लपवून आसवांना थोडे हसेन म्हणतो
Gazalkar Ajay Deshpande 


🌹लपवून आसवांना थोडे हसेन म्हणतो🌹


सोसून खूप झाले आता लढेन म्हणतो

लपवून आसवांना थोडे हसेन म्हणतो


मी बडविणार नाही आता नकार घंटा

गाणे नव्या युगाचे मी आळवेन म्हणतो


कुठलेच शस्त्र नव्हते मी काल उपसलेले 

 भात्यात बाण बाकी ते वापरेन म्हणतो


केलेत काल ज्यांनी घायाळ काळजाला 

 आता हिशेब त्यांचे मी चूकवेन म्हणतो


जे सोसले मुक्याने ते विसरणार नाही

 हृदयात साठले जे ते आठवेन म्हणतो


 उपकार जन्मभूचे फिटणार ना कधीही

अर्पूण देह माझा ओटी भरेन म्हणतो


आरोप काल झाले जे खोडसाळ होते

आता खरे पुरावे गोळा करेन म्हणतो


अंदाज ठोकताळे खोटेच काल ठरले

 संकल्प पाडव्याचा सार्थ ठरेन म्हणतो


शिरजोर आज झाली परकीय चालरीती 

 सजवूनिया गुढी ही संथा जपेन म्हणतो


अजय देशपांडे

वरूड जि. अमरावती

मो. 9527673067


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments