• गझल प्रभात • (भाग २६ )
![]() |
| Gazalkar Nishant Guru |
🌹शिरजोर झाला काजवा🌹
अंगार प्यालो मी कुणी गावात केला गवगवा
बर्फात आहे झाकला मी मात्र शब्दांचा थवा
सारे शहर झाले सुगंधी वाढली धडधड उरी
चाहूल येण्याची तिच्या घेऊन आली ही हवा
मरणार आहे मी सखे आता तरी येशील का
तू एकदा कर चौकशी मी फेकुनी देतो दवा
या मोगऱ्याच्या पाकळीने ऊर माझा कापला
ह्रदयात झाल्या गुदगुल्या मुरला सुगंधी गारवा
हा देश माझा वीष धर्माचे पिउन झाला मुका
सांगू कुणाला आपली ही लोकशाही वाचवा
सूर्यास आहे आणले मी माणसांच्या सोबती
आता तरी ह्रदयातला अंधार काळा पांगवा
कप्पा प्रकाशाचा तुझ्या ह्रदयात आहे कोंडला
आता कशाला बोंब ही शिरजोर झाला काजवा
निशांत गुरू
शिरपूर, ह. मु. नाशिक
मो. 9422218155
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments