Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तरही ग़ज़ल -Sadanand Dabir

तरही ग़ज़ल

तरही गझल
Sadanand Dabir 


      1. तरही ग़ज़ल म्हणजे,एखाद्या कवीच्या ग़ज़लेचा एक मिसरा फक्त घ्यायचा (किंवा शिक्षकाने द्यायचा) व त्या बरहुकूम इतरांनी ग़ज़ल लिहायची,व तो मूळ मिसराही ग़ज़लेत ठेवायचा.

   त्या मूळ मिस-याच्या कवीचा नामोल्लेख करून त्याचे श्रेय त्याला द्यायचे.अशी प्रथा आहे.

मराठीत अनेकदा मूळ कवीचा नामोल्लेख करत नाहीत,इतकेच नाहीतर, तरही ग़ज़ल झाल्यावर मूळ मिसराही बदलून टाकून,ती आपलीच ग़ज़ल म्हणून भासवली जाते,हे अत्यंत गैर आहे.

असे मला वाटते.

2.ही माहिती ब-याच गजलकार कवीला असते.पण

हा प्रकार अस्तित्वात का आला असावा? व ह्याला तरही का म्हणतात? हे माहिती नसते.

मलाही माहिती नव्हते. शोध घेऊनही,फारशी माहिती

हाती आली नाही.

पण काही अंदाज,काही तर्क पुढे देतोय.ते ऑथेंटिक 

असल्याचा कुठलाही दावा,मी करत नाही.

2.1 दिलेल्या मिस-याच्या बरहुकूम लिहा.म्हणजे

इस तरहा लिखिये! ह्यावरून तरही शब्द झाला असावा.

2.2 पूर्वीच्या काळी उस्ताद शायर आपल्या शिष्याला वेगवेगळ्या वृत्तात लिहायला शिकवताना,आपला किंवा,मोठ्या गाजलेल्या शायरचा,त्या वृत्तातला मिसरा देत असतील.व त्या वज्नात लिहायला सांगत असतील.इस तरहा लिखो....वरून, तरही गज़ल शब्द आला असावा.

2.3 तिसरा तर्क असा की...गायक,वादक,नर्तक हे सगळे कलाकार रोज रियाज करतात.कवी/शायरांनी काय करायचे? रोज नवी रचना सुचेलच असे नाही.

अशावेळी त्याने दुस-या कवीची ओळ घेऊन तसे लिहायचा सराव करायचा.स्वतः पुरता! प्रसिद्धी साठी नाही.थोडक्यात,कवीने केलेला लिहिण्याचा सराव,लिहिण्याचा रियाज म्हणजे तरही.तो रियाजच

म्हणजे प्रसिद्धीसाठी नाही.


3. तज्ज्मीन ग़ज़ल.

जेव्हा एक कवी दुस-या कवीच्या गजलच्या मतल्यात सिद्ध झालेली *जमीन* म्हणजे बहर,काफिया,अलामत,रदीफ घेऊन स्वतःची वेगळी 

ग़ज़ल लिहितो.त्याला तज्ज्मीन म्हणतात.


अनेकदा खूप मोठ्या दिवंगत शायराला आदरांजली म्हणून त्याच्या गजलवर,इतर शायर तज्ज्मीन करतात.

3.1अन्य कारणे ही असतात.पण ज्या गजलकाराच्या

गजलवर तज्ज्मीन करतात,त्याचा आदरपूर्वक नामोल्लेख करतात.

3.2 मराठीत गाजलेली तज्ज्मीन म्हणजे,मंगेश पाडगावकरांची मूळ गजल ऐकून,सुरेश भटांना सुचलेली गजल.

पाडगावकरांची गजल अशी,

डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली

वचने मला दिलेली,विसरून रात्र गेली!

भटांची गजल...

केव्हातरी पहाटे,उलटून रात गेली

मिटले चुकून डोळे,फसवून रात गेली!

तज्ज्मीन गजलची मूळ गजलही गाजलेली असते.शिवाय तज्ज्मीन करणारा कवीही मूळ कवीचे नाव सांगतो.त्यामुळे वाङमयचौर्य नसते.

3.3 मात्र हल्ली आधी तरही गजल करायची,मग

मूळ तरहीचा मिसरा काढून आपला मिसरा बसवायचा व ती ग़ज़ल स्वतःची स्वतंत्र गजल असल्यासारखी सादर करायची.हा जो प्रकार होतोय

तो अश्लाघ्य वाङमयचौर्याचाच प्रकार आहे.

त्याचा निषेधच व्हायला हवा.

तुम्ही चार वाचकांना फसवू शकाल,पण स्वतःला 

नाही फसवू शकत.

नव्याने गजल लिहिणा-याने असे मोह टाळलेले बरे.

असे शाॅर्टकट महागात पडतात.

3.4 माझे नाव व्हावे,मला प्रसिद्धी मिळावी,म्हणून जर तुम्ही ग़ज़ल लिहित असाल तर ग़ज़ल तुम्हाला* 

कधीही वश होत नाही.ही खूणगाठ मनाशी पक्की

बांधून ठेवा.

 गजलच्या प्रेमात पडून,अत्यंत नम्रपणे, तुम्ही

गजलसाठीच गजल लिहाल,समर्पित व्हाल तरच गजल तुम्हाला वश होण्याची शक्यता असते.

माझे एक मुक्तक आहे.

श्रावणाचे गीत ओले,यावया ओठांवरी

आसवांच्या पावसाने,मन भिजावे लागते

श्वास हा आयुष्य हे,सर्वस्वही, वेड्यापरी

ग़ज़ल जे मागेल ते ते,देत जावे लागते!


4. तरही गजलचा फायदा गजल गायकांना?

  उर्दू, हिंदी, मराठीतलेही अनेक ख्यातनाम गजल गायक आपल्या गायन मैफिली करत असतात.

प्रत्येकाच्या काही गाजलेल्या रचना असतात,ज्या त्यांना लोकाग्रहास्तव म्हणाव्या लागतातच.अशा गजला,त्यांचे सगळे शेर,सगळ्या हरकतीं सकट

श्रोत्याला पाठ असतात

अशा वेळी मैफिलीत रंग भरण्यासाठी, तरहीचा चांगला शेर मिळाला तर त्या शायरचे नाव सांगून,तो नवा शेर गातात,व मैफिलीत रंग भरतात.श्रोत्यांनाही ते आवडते.


5. कवींनी तरही गजलच्या फार नादी लागू नये!

असे मला प्रामाणिकपणे वाटते.त्याची कारणे अशी.

5.1. साहित्यात, तरही गजलला फारसे स्थान नाही.उर्दूतही तरही गजलला, प्रतिष्ठा नाही.तो प्रकार हलका मानला जातो.

5.2 तरहीचा सर्वात मोठा धोका हा की, काही काळाने कवीला,स्वतंत्रपणे काहीच सुचत नाही.

कोणी ओळ दिली तरच तो पटापट गजल लिहू शकतो.असे काही कवी मला माहित आहेत.

5.3 दुस-या कवींचे संग्रह वाचूनही त्यांना तरही

करता येत नाही.कारण सगळी गजल वाचल्यानंतर 

 तरही लिहिताना, त्यात काही थ्रिल रहात नाही.

असे हे कवी सांगतात.म्हणून त्यांना तरही मिसरा

अन्य कोणीतरी द्यावा लागतो.

5.4 माझ्या संपर्कातले काही कवी/कवयित्री सांगतात त्यांना गजल सुचतच नाही.तरही मिसरा

दिला तर काही सुचते तरी.

त्यांना मी हेच सांगतो,की तुम्ही कविता स्वतंत्रपणे लिहिता,त्यासाठी तुम्हाला दुस-या कवीची ओळ लागत नाही,मग गजल का सुचत नाही?

सुचेल तुम्ही तंत्राची भीती बाळगून लिहू नका.

चुका करतच शिकाल.

5.5 मित्र हो शेवटी आपली निर्मिती ती आपली निर्मिती,तिचा आनंद वेगळाच. तरही,तज्ज्मीन...

ह्याचे निखळ श्रेय आपल्याला मिळत नाही.अगदी

इतरांपासून ही उसनवारी लपवली तरीही आपण मनोमन जाणत असतोच,की आपण तरही करून,

मिसरा बदलून मिरवतोय.आपण स्वतःला कसे फसवाल?.

. सदानंद डबीर.9819178420


.(आवडल्यास मुक्तपणे शेअर करा.)

Post a Comment

0 Comments