• गझल प्रभात • (भाग ४७ )
![]() |
Gazalkar Baban Dhumal |
🌹 तसे वाद सारे घडू लागले🌹
जशी बोलण्याला तुझ्या धार आली तसे वाद सारे घडू लागले
जसा प्रश्न केला तशी उत्तरे ही खरे बोलणे का कडू लागले
कधी पान माझ्याविना हालले ना कधी श्वास माझ्याविना घेतला
जसे कान भरले जुन्या मैत्रिणीने जुने मित्रही आवडू लागले
नको ही पिडा रोजची काळजाला म्हणूनी तुला सोडुनी चालता
जरा दूर जाता अचानक असे हे सखे पाय माझे अडू लागले
तुझ्याविन सुखाला नसे चव कशाची जराही मनाला नसे शांतता
तुझा भास होता मनाच्या तळाशी ह्दय आठवाने रडू लागले
खऱ्यानेच आता सखे लागलेली जुन्या वैभवाला उतरती कळा
नसे चित्त थाऱ्यावरी जीवनी या नको तेच फासे पडू लागले
तुला शेवटी जाहली उपरती अन् मला भेटण्या लावला फोन तू
तुझा फोन सजणी उचलण्या अगोदर उरी का असे धडधडू लागले
पुन्हा जोम चढला पुन्हा मोद भरला तुझ्या लौकिकाला लगडली फुले
नव्याने सखे तू मिठी मारल्याने जुने दुःखही अवघडू लागले
बबन धुमाळ
पुणे,
मो. 9284846393
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments