Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मारवा फुलणार आहे Gazalkara Akshata Deshpande

• गझल प्रभात • (भाग २९ )

मारवा फुलणार आहे
Gazalkara Akshata Deshpande 

🌹मारवा फुलणार आहे 🌹


अंतरीच्या भावनांचे गीत मी गाणार आहे

रोखले कोणी तरीही मारवा फुलणार आहे


प्रेम ठरले एकतर्फी आणि आली ही निराशा

का उगाचच गुंतले मी हे कधी कळणार आहे


जीव जडला का तुझ्यावर होत नाही हा खुलासा

वाटते आता मला ही वेदना छळणार आहे 


सूर्य जाता पश्चिमेला सावलीही दूर गेली

सोबतीला कोण माझ्या मग इथे असणार आहे 


वाट होती मोकळी अन मी तरी बंदिस्त झाले

काळजाचा एक तुकडा वाटतो तूटणार आहे


जे म्हणाले एकटीने सोसले का व्याप सगळे

देव असता पाठराखा ना कधी हरणार आहे


एक मिसरा वेगळा पण खूप सुंदर आज सुचला

हेच नक्की आज माझी ही गझल खुलणार आहे


अक्षता देशपांडे

मिरा रोड, ठाणे

मो. 9987671715


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments