• गझल प्रभात • (भाग ३१ )
![]() |
Gazalkar Jayram More |
🌹जगण्याची परवड आहे🌹
जिंदगी तशी अवघड आहे
चालली तरी धडपड आहे
मिळवण्या एक घास सुखाचा
किती चालली तडफड आहे
खोटा आहे देशाभिमान
खुर्चीसाठी धुळवड आहे
दिसत नाही विकास कोठे
कुठे तरी बघ गडबड आहे
महाग झाली चटणी भाकर
अन् जगण्याची परवड आहे
जयराम मोरे
सोनगीर, जि. धुळे
मो. 7709565957
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments