Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

श्वास Gazalkara Anuradha Waykos

 • गझल प्रभात • (भाग ३० )

श्वास
Gazalkara Anuradha Waykos 

🌹श्वास 🌹


तसे ही घाव हृदयाचे तुला दिसले कधी नाही.

असेही श्वास घेते पण तशी जगले कधी नाही.


जगाला सांगते बाता हसूनी जीवनाच्या मी

मनाच्या चौकटी बाहेर ही पडले कधी नाही.


जुना तो श्वास दे माझा तुला जो भेट केलेला,

तुला मी फारशी थोडी सख्या कळले कधी नाही..


हवी होती कुठे दौलत तुझ्या प्रेमात पडल्यावर,

जरा नादान होते मी तरी फसले कधी नाही.


कितीदा ठेच लागे पावलांना चालतांना या,

तरीही शोधल्या वाटा नव्या हरले कधी नाही.


सौ. अनुराधा वायकोस

परभणी

मो. 73853 58580 


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments