Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

शेवटी Gazalkar Atul Deshpande

• गझल प्रभात •   

शेवटी



🌹शेवटी 🌹


धग चितेची का अचानक वाढली मग शेवटी 

कोणती अतृप्त इच्छा पेटली मग शेवटी


काय सांगू नर्तकीच्या स्वाभिमानाची कथा 

चाळ बांधुन आसवांचे नाचली मग शेवटी 


दार ठोठावून जेव्हा सुख म्हणाले यायचे 

केवढी दुःखास भीती वाटली मग शेवटी


फक्त दुष्कर्मात इतका वाहवत गेला पुढे 

संचिताने प्रेतयात्रा काढली मग शेवटी


देश किंवा बांधवांशी राखतो निष्ठा कुठे 

घेतलेली ती प्रतिज्ञा मोडली मग शेवटी


पाहतो तर सुंदरीवर सभ्य नजरा रोखल्या 

सभ्यतेने मान खाली घातली मग शेवटी


ठेवला बापापुढे मी शेर बापावर असा 

आसवे दोघात आम्ही वाटली मग शेवटी 


अतुल देशपांडे

नाशिक.

 

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments