Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

कर निखारे अचेत देहाचे Gazalkara Smita Gorantiwar

 • गझल प्रभात • (भाग ३४ )

कर निखारे अचेत देहाचे
Gazalkara Smita Gorantiwar 


🌹कर निखारे अचेत देहाचे🌹


पुण्य आहे जमेत देहाचे

मोक्ष माझ्या कवेत देहाचे


वेदनेलाच तू रहा म्हटले

पण दिवस संपलेत देहाचे


जन्मभर हाल सोसले मी ही

सापळे राहिलेत देहाचे


अवयवांची हताश ही कुरबुर

भोग मी मिटवलेत देहाचे


थेंबभर पाजणे नको गंगा

ताटकळले कुठे प्रेत देहाचे


झेलुनी आग जाहल्यावरती

मी बदललेत बेत देहाचे


चेतना संपली तुझ्यामधली

कर निखारे अचेत देहाचे



स्मिता गोरंटीवार

वणी जि. यवतमाळ  


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments