Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नव्हती खूण ठेवली गळा कापल्याची Gazalkar R K Athavale

 • गझल प्रभात •    (भाग २५ )

नव्हती खूण ठेवली गळा कापल्याची
Gazalkar R K Athavale


🌹नव्हती खूण ठेवली गळा कापल्याची🌹


भिंत न तोडू शकलो आम्ही जातीधर्माची

मी मग झालो दुसरीचा अन् तीही दुसऱ्याची!


रुमाल उचलुन तिला दिला इतके कारण झाले 

माझ्यावर मग पाळी आली डोळे पुसण्याची


डोळ्यांमध्ये तिच्या हरवलो होतो कायमचा

तसदी नाही तिने घेतली मला शोधण्याची


गुलाब माझा स्विकारूनही पिडले किती मला  

बंद ठेवली तिने पाकळी अपुल्या ओठांची 


माझ्या फांदीवरचे घरटे सोडुन गेली ती

त्या मैनेला सवय असावी झाड बदलण्याची!


तिने खुबीने वापर केला होता केसांचा

मुळीच नव्हती खूण ठेवली गळा कापल्याची


कुणी खोलवर प्रहार केला त्याच्या हृदयावर 

फुले सोडुनी संगत करतो आहे काट्यांची


आर. के. आठवले

सिल्लोड, छ. संभाजीनगर

मो. 9011895917


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments