• गझल प्रभात • (भाग ४५ )
![]() |
Gazalkar Nitin Surve |
🌹दानात मागतो मी 🌹
इतुकेच भाग्य देवा, दानात मागतो मी
गुणधर्म वैष्णवांचे, देहात मागतो मी
शोधून सापडेना, देशात लोकशाही
संघर्ष बा भिमाचा, जगण्यात मागतो मी
प्रेमात चालणारा, संसार हा सुखाचा
तडजोड जीवनाची, दोघात मागतो मी
आभाळ फाटलेले, उध्वस्त रान झाले
सन्मान मग बळीचा, भावात मागतो मी
कित्येक संकटानी,आयुष्य त्रासलेले,
आनंद जिंदगीचा, त्रासात मागतो मी
पाऊस घोषणांचा, दुष्काळ योजनांचा,
सरकार सत्यवादी, राज्यात मागतो मी
मुर्दाड माणसांच्या, आहेत मैफिली ह्या,
का दाद शायरीला, क्या बात मागतो मी?
नितीन गजानन सुर्वे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments