• गझल प्रभात • (भाग ४६ )
![]() |
Gazalkara Sharayu Shaha |
🌹लेक बिजलीपरी चमकते अंबरी🌹
गोजिरी साजरी गोड आहे परी
आगळी वेगळी पोरगी साजरी
जन्मते वाढते लेक बापा घरी
मात्र आयुष्यभर कष्टते सासरी
वेल निगुतीत जोपासली या घरी
वाढते बहरते साजणाच्या घरी
कोमला नाजुका ही फुलासारखी
दरवळे मोहरे हासुनी लाजरी
दूर जाते जरी कन्यका बावरी
लावते पण लळा सौख्यदा हासरी
रुणझुणत भेटते सागराला नदी
डोंगरा तू स्वतःला अता सावरी
सायली लाजरी वेड लावे मना
मोगऱ्याच्या मनी ही भरे सुंदरी
सासरी मग्न मुलगी बरे वाटले
सावली मायबापास दे सत्वरी
पाहिजे पुत्र म्हणती दिव्यासारखा
लेक बिजलीपरी चमकते अंबरी
डॅा. शरयू शहा
मुंबई.
मो. 9619023330
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments