Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

चंद्र तारे फिके वाटले पाहिजे Gazalkar Pramod Rathod

• गझल प्रभात • (भाग २४ )

चंद्र तारे फिके वाटले पाहिजे
Gazalkar Pramod Rathod 


🌹चंद्र तारे फिके वाटले पाहिजे🌹


ध्येय डोळ्यापुढे ठेवले पाहिजे

पाय थकले तरी चालले पाहिजे 


जन्म घेताच कन्या घरी आपल्या

चंद्र तारे फिके वाटले पाहिजे


रूप मेणाप्रणाने मिळाले तुला

तू उन्हाला अता टाळले पाहिजे


वार हृदयावरी कर असा एकदा

आरश्याचे तडे लाजले पाहिजे


प्राण शस्त्राविना पाहिजे जर तुला

ओठ ओठांवरी ठेवले पाहिजे


वेदनाही तुला गोड वाटेल पण

वार मित्रांकडुन जाहले पाहिजे


गोडवा प्रेम वात्सल्य शहरात या

गावखेड्याकडुन, आणले पाहिजे


प्रमोद राठोड

मो. 8806010977 


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments