Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

त्याला बकरे दिसतो आपण Gazalkar Satishsingh Malve

• गझल प्रभात • (भाग २३ )

त्याला बकरे दिसतो आपण
Gazalkar Satishsingh Malve 


🌹 त्याला बकरे दिसतो आपण 🌹


जरी शहाणे असतो आपण

वेड्यागत वावरतो आपण


जन्म एकदा होतो अपुला

क्षणाक्षणाला मरतो आपण


नजर आपली मेली आहे 

काय कत्तली बघतो आपण


विश्व मानतो डबक्याला अन् 

त्याला सागर म्हणतो आपण


फक्त पाहतो वरची बाजू

खोलात कुठे शिरतो आपण


परिस्थितीशी युद्ध आपले 

पोटासाठी लढतो आपण


काळ कसाई बनतो तेव्हा 

त्याला बकरे दिसतो आपण


सतिश गुलाबसिंग मालवे

मुऱ्हा देवी, अमरावती

ह. मु. शिक्रापूर, पुणे

मो. 9527912625


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments