Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पखाल Gazalkara Sanjivani Tophkhane

• गझल प्रभात • (भाग २२ )

पखाल
Gazalkara Sanjivani Tophkhane 

🌹 पखाल 🌹


आठवणींचा महाल आहे हृदयी माझ्या

केली त्यांनी कमाल आहे हृदयी माझ्या


सय प्रीतीची कोमल हळवी जपली होती

परी वंचना जहाल आहे हृदयी माझ्या


विसरू म्हणते सर्व वेदना आजवरीच्या

खऱ्या सुखाची धमाल आहे हृदयी माझ्या


वसंत गेला रंगपंचमी कधीच सरली

कॄष्णप्रितीचा गुलाल आहे हृदयी माझ्या


जरी तमाचा पूर सभोती असे दाटला

हरी नामाची मशाल आहे हृदयी माझ्या


अनावधाने जरी जाहले कर्म चुकीचे

सत्कर्मांची पखाल आहे हृदयी माझ्या


डॉ. संजीवनी तोफखाने

मो. 9011068853


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments