• गझल प्रभात • (भाग ३९ )
Gazalkara Alpana Deshmukh -Nayak
🟣 नवरात्र विशेष 🟣
🟡आजचा गझल रंग- पिवळा 🟡
🌹धडे ठेवले सर्व गिरवून मी 🌹
तुझी सावली मी, तुझे ऊन मी
कशी दूर जाऊ तुझ्यातून मी?
प्रवाहात या पाय टाकू नको
तुला दूर नेईन वाहून मी
तुला गाठणे शक्य झाले कुठे
किती पाहिले मार्ग बदलून मी
हवे तेवढे दूर जाऊन बघ
तुझे विश्व घेणार व्यापून मी
असू दे,कळाल्या तुझ्या भावना
पुन्हा घेतले आज समजून मी
जगाशी कसे काय वागायचे
धडे ठेवले सर्व गिरवून मी
किती वेगळा वाटला चेहरा
मला पाहिले खूप जवळून मी
जुन्या जाणत्या वेदना भेटल्या
शहर पाहिले पूर्ण भटकून मी
अल्पना देशमुख-नायक
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments