• गझल प्रभात • (भाग ४० )
![]() |
Gazalkara Hemlata Patil |
🟣 नवरात्र विशेष 🟣
🟢आजचा गझल रंग- हिरवा 🟢
🌹तरी म्हणते बरी आहे🌹
मनी असते सुरू वादळ तरी म्हणते बरी आहे
उराचा पाझरे कातळ तरी म्हणते बरी आहे
जिवाला जाळती तारे,गुलाबी झोंबते वारे
कुडाची फाटली वाकळ तरी म्हणते बरी आहे
हसू मी चेहऱ्यावरती जरी ताणून अंथरते
सलींचे बोचती मज सळ तरी म्हणते बरी आहे
तुझ्याशी फोनवर बाबा हसुनच बोलते कायम
अनावर जाहला ओघळ तरी म्हणते बरी आहे
उभे आयुष्य घालवले जरी वैराण माळावर
व्यथांची तेवढी हिरवळ तरी म्हणते बरी आहे
किनारी लागण्यासाठी झगडते लाट ही आहे
भले अंगात उसने बळ तरी म्हणते बरी आहे
जिच्यामध्ये भलेमोठे म्हणे ब्रम्हांड सामावे
रिती माझीच ती ओंजळ तरी म्हणते बरी आहे
हेमलता पाटील
शहादा जि. नंदुरबार
मो. 8669115882
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments