Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

कुंकू-Gazalkara Madhuri Chavan Joshi

• गझल प्रभात •    (भाग ३८ )

कुंकू
Gazalkara Madhuri Chavan Joshi


🟣 नवरात्र विशेष 🟣

🔵आजचा गझल रंग- निळा 🔵


🌹 कुंकू 🌹


विस्कटल्या नात्याचे कुंकू, 

असे काय कामाचे कुंकू? 


आजी लावायची कपाळी, 

मातीच्या वासाचे कुंकू... 


निळे, केशरी, हिरवे दिसते, 

हे जाती धर्माचे कुंकू... 


निगुतीने सांभाळशील ना, 

तुझे स्वाभिमानाचे कुंकू ?


लपवत फिरतो अश्वत्थामा, 

भाळावर शापाचे कुंकू... 


किती निरागस भासत असते, 

हळदीच्या अंगाचे कुंकू... 


स्वतःच बन सौभाग्य तुझे तू, 

लाव तुझ्या नावाचे कुंकू...


माधुरी चव्हाण जोशी 

देवगड


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments